
राज्य शासन आता बालविवाह रोखण्यासाठी इतर काही राज्यांच्या पद्धतीचा अवलंब करून महाराष्ट्रातही लग्नपत्रिकेवर नवरा-नवरीच्या नावापुढे जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या विचारात असल्याचे समजते.
असा निर्णय घेणे म्हणजे देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रासाठी हाराकिरीच ठरेल.
एका बाजूला बालविवाह रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, सक्षम यंत्रणा उभारणे आणि व्यापक जनजागृती यांसारखे अनेक प्रभावी मार्ग उपलब्ध असताना अशा प्रतीकात्मक उपायांवर भर देणे योग्य नाही.
महाराष्ट्र कधीही इतर राज्यांच्या मागे चालत नाही; उलट देशाला दिशा देण्याचे काम करतो.









