
आ.खताळ यांच्या सूचनेनंतर तातडीने केले काम…..
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी पायी दिंडी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पारेगाव बुद्रुक येथील अहिल्यानगर नाशिक जिल्हा सरहद्दी वरील पालखी मार्गाचे रखडलेले डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने अवघ्या चार दिवसांत पूर्ण केले आहे. त्यामुळे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार्या लाखो वारकर्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यापूर्वीच भाविकांना कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
आमदार अमोल खताळ यांनी आठ दिवसांपूर्वी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखी आगमनापूर्वी चार ते पाच दिवसांत उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.या सूचनां नुसार पालखीमार्गाची दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आणि अवघ्या चारच दिवसांत डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

पालखी मार्गाच्या डांबरीकरणाचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल पारेगाव बुद्रुकचे माजी उपसरपंच कैलास गोर्डे ,सामाजिक कार्यकर्ते सावित्रा गडाख रावसाहेब गडाख, बाबासाहेब गोर्डे , सुरेश दळवी, किशोर गडाख, सुनील गडाख बाळासाहेब गडाख, सुनील वाकचौरे,, भीमराज गडाख निलेश गडाख यांच्यासह ग्रामस्थ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांचे विशेष आभार मानले.….









