
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे आयोजित बँकिंग समिट 2026 मध्ये SMBT अमृतवाहिनी बँकेला “भारतरत्न सहकारिता सन्मान 2026” या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संग्राम पतसंस्थेच्या वतीने बँकेचे चेअरमन मा. श्री. जोशी साहेब, व्हा. चेअरमन मा. श्री. शिंदे साहेब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गुजराथी साहेब यांचा सत्कार करण्यात आला.सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि समाजहिताच्या बँकिंग सेवांबद्दल मिळालेला हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.








