
संगमनेर (प्रतिनिधी) : डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मेडिकव्हर हॉस्पिटल, संगमनेर येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन डायलिसिस मशीनचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या सुविधेमुळे मूत्रपिंड विकारांवरील उपचार अधिक प्रभावी, सुरक्षित व दर्जेदार पद्धतीने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दरमहा सुमारे ८०० ते १००० डायलिसिस करण्यात येतात. रुग्णांच्या सेवेसाठी येथे २४ तास डायलिसिस सुविधा उपलब्ध असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यावर हॉस्पिटलचा भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सागर हासे, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. काजल दरंदले तसेच मेडिकव्हर हॉस्पिटलच्या केंद्र प्रमुख डॉ. स्नेहल गायके उपस्थित होत्या. तसेच डायलिसिस विभागाचे इन्चार्ज शुभम केरे यांच्यासह संपूर्ण डायलिसिस टीम आणि हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संगमनेर व परिसरातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटल सातत्याने प्रयत्नशील असून, भविष्यातही अशाच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला….








