
संगमनेर शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे अनेक रस्त्यांची मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली आहे.त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे नगरपालिका प्रशासनाने तातडीने बुजविण्यात यावे अशी मागणी शिव सेना महायुतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
संगमनेर शहरात नगरपालिकेच्या वतीने भूमिगत गटारी खोदकाम केल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे शहरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असे अवस्था झाली आहे खड्ड्यांमुळे नागरिक व वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकी स्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित होऊनही नगरपालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नसल्याची नाराजी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे व्यक्त करत नगर परिषद प्रशासनाने केवळ प्रसिद्धी न करता गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवून भूमिगत गटार योजनेमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी शिवसेना महायुतीचे राहुल भोईर ,शशांक नामन , गुड्डू इंजिनिअर, बबलू काजी, जावेद शेख, सागर भोईर, पवन शिरतार, भगवान कुक्कर,महेश मांडेकर, यांच्यासह शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे…








